Raise your Query

Hi! Simply click below and type your query.

Our experts will reply you very soon.

WhatsApp Us
Search Property

Search Properties

Where in

Locality

I Want to

Property Type

Budget

Bedroom


महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळत आहेत अनेक फायदे

Posted by Admin on August, 24, 2021

घर खरेदी करताना अनेकजण त्याची नोंदणी महिलांच्या नावाने करण्याला प्राधान्य देतात. कारण, महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास अनेक फायदे मिळतात. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ आणि करातून सूटही मिळते.आयकरात महिलांना कायमच मोठी सूट मिळते. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा भाग करमुक्त असतो. अशावेळी महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास आयकरात मोठी सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज काढत असाल तर महिलांसाठी तुलनेने कमी व्याजदर असतो. भारतीय स्टेट बँकेत महिलांना गृहकर्जावर इतरांपेक्षा 0.5 टक्के कमी व्याजदर आहे. तसेच घर खरेदी करताना त्याची नोंदणी महिलेच्या नावाने झाली तर स्टॅम्प ड्युटीत बरीच सूट मिळते. महिलांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (पीएमएवाय) लोअर इनकम ग्रुप (एलआयजी) किंवा इकोनॉमिक विकर सेक्शन कॅटेगरी (ईडब्ल्यूएस) अंतर्गत अनुदान घेण्याकरीता घरातील एका महिलेला मालकी देणे बंधनकारक आहे.
SBI कडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी होम लोनवर विशेष ऑफर
त्याच वेळी जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याजदर 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.95 टक्के व्याजदर असेल. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर फक्त 7.05 टक्के असेल.
*महत्वाची टीप- महिलेच्या नावावर घर घेऊन वरील प्रमाणे स्टॅम्प ड्युटी मध्ये सूट घेतल्यास ते घर कमीत कमी १५ वर्षे विकता येणार नाही याची नोंद घ्यावी*
रिअल इस्टेट गणेश
महारेरा रजिस्टर एजंट
9967945426
www.realestateganesh.in


This entry was posted on August, 24, 2021 at 09 : 29 am and is filed under Information. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response from your own site.

Leave a Comment

(required)
(required) (will not be published)