Search Property

Search Properties

Where in

I Want to

Property Type

Budget

Bedroom


घर विकत घेताना गृहकर्ज विषयीची ही माहिती आधी जाणून घ्या

Posted by Admin on August, 14, 2021


स्वत:चे घर (Home)असावे हे सर्वांचेच स्वप्न असते. मात्र घरांच्या किंमतीमुळे घर विकत घेणे (Buying a home) ही सोपी बाब नसते. बहुतांश लोक घर विकत घेताना बॅंक (Bank) किंवा वित्तसंस्थाकडून (NBFC) गृहकर्ज (Home loan) घेत असतात. गृहकर्ज घेताना काही बाबी लक्षात घेणे (Points to be considered before taking home loan) अत्यंत महत्त्वाचे असते. गृहकर्ज घेताना प्राप्तिकर विवरणपत्र, तुमचे बजेट, इतर आर्थिक बाबी या खूप महत्त्वाच्या असतात. हे मुद्दे लक्षात घेतल्यास तुम्हाला दीर्घकालावधीसाठी आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावरदेखील (Home loan interest rate) याचा परिणाम होत असतो. शिवाय तुम्हाला गृहकर्जाचा योग्य पर्याय त्यामुळे मिळण्यास मदत मिळू शकते. गृहकर्जाशी निगडीत ५ महत्त्वाची सूत्रे (Home loan tips)जाणून घेऊया. या सूत्रांची अंमलबजावणी केल्यास तुम्ही मोठा आर्थिक फायदा मिळवू शकाल.


१. क्रेडिट स्कोअर (Credit score)-

जेव्हा तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बॅंक असो की कोणतीही विगर बॅंकिंग वित्तसंस्था असो, तुमचा क्रेडिट स्कोअर सर्वात आधी पाहिला जातो. तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात का, तुम्हाला किती रकमेचे कर्ज दिले जाऊ शकते, तुम्हाला मिळणाऱ्या कर्जावर किती व्याजदर असणार हे सर्व तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. तुमचे क्रेडिट रेटिंग जर चांगले असेल तर तुम्हाला स्वस्तदराने म्हणजे कमी व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. त्याउलट क्रेडिट रेटिंग किंवा क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागू शकते. ८०० पेक्षा जास्त बेसिस पॉइंटच्या वर असणारा क्रेडिट स्कोअर चांगला समजला जातो. बॅंका चांगल्या क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना कर्ज देण्यास इच्छुक असतात. कारण चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे त्या ग्राहकाकडून वेळेवर कर्जाची परतफेड होण्याची शक्यता अधिक असते. तुमचे सध्याचे ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर जमा करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता.


२. ज्वाइंट होम लोन घ्या (Joint Home loan)-

ज्वाइंट म्हणजे संयुक्त गृहकर्ज घेण्याचे अनेक फायदे असतात. जेव्हा गृहकर्ज दोन जणांनी मिळून घेतले जाते तेव्हा गृहकर्जाची पात्रता अधिक वाढते. कारण बॅंक गृहकर्ज देताना दोघांचे उत्पन्न लक्षात घेते. त्यामुळे अधिक रकमेचे गृहकर्ज मिळू शकते. शिवाय परतफेडीच्या वेळेसदेखील याचा लाभ घेता येतो. सर्वसाधारणपणे पती आणि पत्नी हे दोघे मिळून गृहकर्ज घेताना दिसतात. जर अर्जदारापैकी एक महिला असेल तर गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठीची मागणी बॅंकेकडे करता येते. काही बॅंक अशा परिस्थितीत अर्धा टक्का व्याजदर कमी करू शकतात. या लाभांव्यतिरिक्त जर कर्ज संयुक्तरित्या म्हणजे ज्वाइंट होम लोन घेतले असेल तर गृहकर्जाच्या परतफेडीची जबाबदारी दोन्ही व्यक्तींवर असल्याने भार कमी होतो.


३. कमीत कमी व्याजदर मिळवणे (Less interest rate)-

वेगवेगळ्या बॅंका किंवा वित्तसंस्था गृहकर्ज वेगवेगळ्या व्याजदराने उपलब्ध करून देतात. शिवाय व्याजदरावर बोलणी करण्यासही बॅंका किंवा वित्तसंस्था तयार असतात. व्याजदरातील छोट्याशा फरकामुळे दीर्घकाळात तुमची मोठी बचत होऊ शकते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध बॅंका किंवा एनबीएफसीमधून स्वस्तातील गृहकर्जाची निवड करावी. जर तुम्ही असे एखादे घर किंवा प्रॉपर्टी विकत घेत असाल ज्याच्या मालकाने आधीच गृहकर्ज घेतलेले असेल तर बॅंक अशा मालमत्तेवरील कर्जाची प्रक्रिया लवकर पूर्ण शकू शकतात. याशिवाय तुम्हाला अशा परिस्थितीत तुलनेने कमी व्याजदरावर गृहकर्ज मिळू शकते.


४. कागदपत्रे नीट वाचा (Reading documents carefully)-

कर्ज देणारी बॅंक किंवा वित्तसंस्था कर्ज देण्याआधी तुम्हाला अनेक विविध कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगते. सर्वच कागदपत्रे नीट वाचणे हे अवघड काम असले तरी तुम्हाला जितक्या बारकाईने आणि काळजीपूर्वक ही कागदपत्रे वाचता येतील तितकी ती वाचावीत. छोट्या अक्षरांमध्ये लिहिण्यात आलेल्या अटींवर विशेष लक्ष द्यावे. कारण यात अनेकवेळा अशा अटी किंवा नियम असतात जी पुढे तुम्हाला अडचणीची ठरू शकतात.


५. जास्तीत जास्त डाउन पेमेंट करा आणि कालावधी कमी ठेवा (Maximum Down payment)-

गृहकर्जासाठी सर्वसाधारणपणे किमान २० टक्के डाउन पेमेंट म्हणजे रोख रकमेची अपेक्षा केली जाते. कर्ज देताना बॅंक इतक्या रकमेची मागणी करते. अर्थात ही किमान रक्कम आहे. जाणकारांच्या मतानुसार ५० ते ६० टक्क्यांपर्यत डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उर्वरित रकमेसाठी गृहकर्ज घ्यावे. म्हणजे ईएमआयची रक्कमदेखील कमी होते. शिवाय जितके डाउन पेमेंट अधिक असेल तितका तुमच्यावर व्याजाचा बोझा कमी पडेल. तुम्हाला तितकीच कमी रक्कम व्याजापोटी बॅंकेला द्यावी लागेल. याचबरोबर अनेकवेळा ग्राहक गृहकर्जाचा कालावधी ३० वर्षांपर्यतचा ठेवतात. परतफेडीचा कालावधी २० वर्षांपेक्षा अधिक नसावा यासाठी प्रयत्नशील राहा. कारण दीर्घकालावधीत ग्राहकाला कर्जावरील व्याजापोटी मोठी रक्कम भरावी लागते. शिवाय एवढ्या मोठ्या कालावधीसाठी व्याजदरातील बदलांनादेखील सामोरे जावे लागते.This entry was posted on August, 14, 2021 at 10 : 18 am and is filed under Information. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response from your own site.

Leave a Comment

(required)
(required) (will not be published)


Raise your Query

Hi! Simply click below and type your query.

Our experts will reply you very soon.

WhatsApp Us